व्हेल्ड पठार
व्हेल्ड पठार : (फेल्ड किंवा फील्ड पठार). दक्षिण आफ्रिकेतील कुराणांखालील व शेतीखालील पठारी प्रदेश. हा समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश ‘व्हेल्ड’ या नावाने ओळखला जातो. उंचीनुसार व्हेल्ड प्रदेशाचे पुढीलप्रमाणे तीन विभाग पडतात : (१) हाय व्हेल्ड (उंची १,२०० ते १,८०० मी.), (२) मिड्ल व्हेल्ड (उंची ६०० ते १,२०० मी.), (३) लो व्हेल्ड (उंची १५० ते ६०० मी.).